रिया अहिरच्या ‘अंकल’ टोमण्याला शहजाद पूनावालांचे प्रत्युत्तर
‘बिग बॉस २०’ मधील प्रवेशावरून सुरू झालेला वाद आता राजकीय वळण घेत आहे. मॉडेल रिया अहिर आणि भाजपाचे माजी प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्यात वाक्युद्ध रंगले आहे. रियाने पूनावाला यांना ‘अंकल’ म्हणत हिणवल्यानंतर, पूनावाला यांनी राहुल गांधी यांचे नाव घेत प्रत्युत्तर दिले. पूनावाला यांनी रियावर राजकीय आरोप केले, तर रियाने त्यांना फेटाळून लावत आपले सामाजिक काम दाखवले.