पुण्यातील तिरंगा यात्रेत मराठी अभिनेत्रीचा सहभाग, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “पाकड्याचा राग…”
२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा बळी गेला होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ले केले. या हल्ल्यातील हिंदू नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि भारतीय लष्कराच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी पुण्यात १८ मे रोजी तिरंगा यात्रा काढण्यात आली. अभिनेत्री स्नेहल तरडे यात सहभागी झाली होती. याबद्दल तिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या कृतीचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.