“मी त्याची फॅन नव्हते”, सोनालीने सांगितला मायकल जॅक्सनच्या भेटीचा किस्सा
अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे यांनी ३० ऑक्टोबर १९९६ रोजी मुंबई विमानतळावर मायकल जॅक्सनचं मराठमोळ्या अंदाजात स्वागत केलं होतं. 'कोण होणार करोडपती' शोमध्ये माधुरी दीक्षितने सोनालीला याबद्दल विचारलं असता, सोनालीने सांगितलं की ती मायकलची चाहती नव्हती, पण नऊवारी साडी नेसून स्वागत करण्याची संधी मिळाल्याने ती उत्सुक होती. कॉन्सर्टनंतर ती मायकलची चाहती बनली.