अभिनेत्रीने चाहत्याशी लग्न करण्यासाठी यशाच्या शिखरावर असताना सोडलेली इंडस्ट्री
दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीजा यांनी त्यांच्या चाहत्याशी लग्न करण्यासाठी चित्रपटसृष्टी सोडली. श्रीजा यांनी मोहनलाल आणि कमल हासन यांसारख्या दिग्गजांबरोबर काम केलं होतं. 'सेव्वंती' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान संधना पांडियन यांनी त्यांना लग्नाचा प्रस्ताव दिला आणि त्यांनी तो स्वीकारला. लग्नानंतर श्रीजा यांनी अभिनय क्षेत्रातून निवृत्ती घेतली. त्यांनी कुटुंबाला प्राधान्य दिले आणि अभिनयात परतण्याच्या अनेक ऑफर्स नाकारल्या.