२० वर्षे प्रेमाची अन् भांडणाची! सूर्या-ज्योतिकाने मुलांच्या उपस्थितीत पुन्हा केले लग्न
दाक्षिणात्य सिनेविश्वातील लोकप्रिय जोडी सूर्या व ज्योतिका यांच्या लग्नाला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. ऑनस्क्रीन सुरू झालेला त्यांचा प्रवास खऱ्या आयुष्यातही यशस्वी ठरला आहे. सूर्या व ज्योतिका यांनी दोन दशके एकमेकांना सुख-दुःखांत साथ देत आयुष्याचा मोठा टप्पा पार केला. लग्नाला २० वर्षे झाल्याने सूर्या व ज्योतिका यांनी पुन्हा एकदा लग्न करून, त्या प्रेमाची वचने पुन्हा एकदा एकमेकांना दिली आहेत. सूर्या व ज्योतिका यांनी चर्चेमध्ये पुन्हा एकदा लग्न केले. याचा व्हिडीओ दोघांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.