‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्रीला सलमान खानच्या ‘बिग बॉस १८’साठी विचारणा
सध्या हिंदी ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाची चर्चा रंगली आहे. प्रसिद्ध युट्यूबर मिथिलेश पटनाकर, आकृति नेगी, जसवंत बोपन्ना, दिग्विजय राठी, सीवेट तोमर, शाइनी आहुजा, पायल मलिक, कृतिका मलिक, अर्जुन बिजलानी आणि इशा कोपिकर यांना ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वासाठी विचारणा झाल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये ‘आई कुठे आई करते’ मालिकेतील अभिनेत्रीचं नाव देखील सामील असल्याचं समोर आलं आहे.