“ही आगाऊ कार्टी जान्हवी…”, मेघा धाडेची संतप्त पोस्ट! रितेश देशमुखला केली विनंती
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनमध्ये घरात दोन गट पडले आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात जान्हवी अन् वर्षा उसगांवकरांमध्ये जोरदार भांडण झालं. जान्हवीने वर्षा यांना मिळालेल्या पुरस्कारांबाबत भाष्य केलं, ज्यामुळे सोशल मीडियावर ती ट्रोल होत आहे. याशिवाय संतप्त पोस्ट शेअर करत 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या पर्वाची विजेती अभिनेत्री मेघा धाडेने जान्हवीला घरातून बाहेर काढण्याची मागणी केली आहे.