BB Marathi : जान्हवीला आली भोवळ! रितेशने उघड केली ‘ती’ चुगली अन् सर्वांनाच बसला धक्का
'बिग बॉस मराठी'च्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने जान्हवी किल्लेकरला तिच्या वादग्रस्त वक्तव्यांबद्दल जाब विचारला. तसेच जान्हवीने या आठवड्यात घरात तिची जवळची मैत्रीण असलेल्या निक्कीबद्दल देखील चुगली केली होती. रितेशने हे सर्वांसमोर उघड केल्यावर जान्हवी ढसाढसा रडू लागली आणि तिला भोवळ आली. याचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.