संग्राम ठरला ‘फुसका बॉम्ब’, घरातील सदस्यांनी अरबाजला दिलं बहुमत, रितेश देशमुख म्हणाला…
शनिवारी (१४ सप्टेंबर) झालेल्या ‘भाऊच्या धक्क्या’वर आर्या जाधव हिला घराबाहेर काढण्यात आलं. कॅप्टन्सी टास्कदरम्यान निक्की तांबोळीला कानशिलात लगावल्यामुळे आर्याला ‘बिग बॉस’कडून कठोर शिक्षा देण्यात आली. याचीच सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. अनेक जण ‘बिग बॉस’च्या निर्णयाचा निषेध करत आहेत. आजच्या (१५ सप्टेंबर) ‘भाऊच्या धक्क्या’वर रितेश देशमुखसह घरातील सदस्य धमाल मस्ती करणार आहेत. याचे व्हिडीओ सध्या व्हायरल झाले आहेत.