“निक्की बिग बॉस मराठी असं नाव घोषित करा”, आर्याला घराबाहेर काढल्यामुळे अभिनेता भडकला
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वातील सातव्या आठवड्यातील कॅप्टन्सी टास्कदरम्यान आर्या आणि निक्कीमध्ये वाद झाला. आर्याने निक्कीला कानशिलात लगावल्यामुळे तिला थेट घराबाहेर काढण्यात आलं. या निर्णयावर अंकुर वाढवेने सोशल मीडियावर निषेध नोंदवला. तसंच अनेक नेटकऱ्यांनीही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय आर्याच्या चाहत्यांनी 'बिग बॉस मराठी' पाहणं बंद केल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.