रितेश देशमुखने दिलेले खास गिफ्ट्स पाहून स्पर्धकांचे डोळे पाणावले, पाहा नवा प्रोमो
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात आज गणरायाचं आगमन होणार आहे. यावेळी रितेश देशमुखच्या 'भाऊच्या धक्क्या'वर दमदार मनोरंजन होणार आहे. लोकप्रिय गायक-गायिकांचे परफॉर्मन्स आणि सलीम-सुलेमान यांची उपस्थिती असेल. 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वातील उत्कर्ष शिंदे स्पर्धकांना रितेशने पाठवलेले गिफ्ट्स देणार आहे. यावेळी स्पर्धक भावुक झालेले पाहायला मिळणार आहेत.