“वाइल्ड कार्ड एन्ट्री…”, संग्राम चौगुलेवर टीका करत मराठी अभिनेत्याने अरबाजचं केलं कौतुक
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील वाइल्ड कार्ड सदस्य संग्राम चौगुलेची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. कारण आहे नुकताच झालेला कॅप्टन्सी टास्क. या कॅप्टन्सी टास्कमध्ये संग्राम अरबाजच्या बाजूने खेळताना दिसला. ‘बी टीम’मध्ये असूनही ‘ए टीम’मधल्या अरबाजबरोबर स्ट्रॅटजी करताना पाहायला मिळाला. एवढंच नाहीतर कॅप्टन्सी टास्कच्या निर्णायक फेरीत तो अरबाजला रोखू शकला नाही. यामुळे सध्या मराठी कलाकारांसह नेटकरी संग्राम चौगुलेवर टीका करताना दिसत आहेत.