Video: “अपनी औलाद को सुधारो…”, निक्की तांबोळीच्या आईला मराठी अभिनेत्रीचा सल्ला, म्हणाली…
शनिवारी झालेल्या भाऊच्या धक्क्यावर ‘बिग बॉस’ने आर्या जाधवला घराबाहेरचा रस्ता दाखवला. निक्कीला कानशिलात लगावल्यामुळे 'बिग बॉस'ने आर्याला ही कठोर शिक्षा सुनावली. पण ‘बिग बॉस’च्या या निर्णयामुळे अनेक जण नाराजी व्यक्त करत आहेत. अशातच एका मराठी अभिनेत्रीचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओतून तिने निक्कीच्या आईला सल्ला दिला आहे.