Video: “मिस्टर इंडिया”, म्हणत रितेश देशमुखने संग्राम चौगुलेची केली कानउघडणी, म्हणाला…
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा सातवा आठवडा देखील दणक्यात पूर्ण झाला आहे. पण आठवड्याच्या शेवटी घरात निंदनीय घटना घडली. ज्याबद्दल सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. कॅप्टन्सी टास्कदरम्यान आर्या व निक्कीमध्ये धक्काबुकी झाली. याच वेळी आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली. यामुळे आर्याला तात्पुर्ती जेलची शिक्षा देण्यात असली तरी आज 'भाऊच्या धक्क्या'वर आर्याला कठोर शिक्षा सुनावली जाणार आहे. अशातच रितेश देशमुखने वाइल्ड कार्ड स्पर्धक संग्राम चौगुलेची चांगलीच कानउघडणी केल्याचं समोर आलं आहे.