“तुम्ही हा आठवडा गाजवला…”, रितेश देशमुखने पंढरीनाथ कांबळेच्या खेळाचं केलं कौतुक, म्हणाला..
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील सातव्या आठवड्याचा कॅप्टन्सी टास्क चांगलाच रंगला. छोट्या गोण्यांमध्ये कापूस भरून खेळलेल्या या कॅप्टन्सी टास्कमध्ये काही सदस्य चांगले खेळले. त्यापैकी एक म्हणजे पंढरीनाथ कांबळे. पंढरीनाथ यांनी अरबाज, वैभव सारख्या तगड्या सदस्यांना चांगलंच पळवलं. याचं कौतुक अभिनेता सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार अशा अनेक कलाकारांनी केलं. त्यानंतर आता ‘भाऊच्या धक्क्या’वर रितेश देशमुखने पंढरीनाथ कांबळेच्या खेळाचं भरभरून कौतुक केलं आहे.