“माझा ग्रुप चुकला”, ‘बिग बॉस’च्या घराबाहेर आल्यानंतर वैभवने मान्य केली स्वतःची चूक
‘बिग बॉस मराठी’ पाचव्या पर्वात आता नऊ सदस्य बाकी राहिले आहेत. सातव्या आठवड्यात दोन सदस्य घराबाहेर झाले. एक म्हणजे आर्या जाधव आणि दुसरा वैभव चव्हाण. कॅप्टन्सी टाक्समध्ये निक्कीला कानशिलात लगावल्यामुळे ‘बिग बॉस’ने आर्याला कठोर शिक्षा सुनावत थेट बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर वैभव चव्हाण एलिमिनेट झाला. यावेळी अरबाज आणि जान्हवी ढसाढसा रडताना पाहायला मिळाले. अरबाजने रितेश देशमुखकडे वैभवला एक संधी देण्याची विनंती केली. पण तसं काही झालं नाही. ‘बिग बॉस’च्या घरात नेमकं काय चुकलं? याविषयी वैभवने आपलं परखड मत मांडलं आहे.