Video: खुशबू तावडेचं दुसरं डोहाळे जेवण घरीच साध्या पद्धतीने पडलं पार, पाहा व्हिडीओ
अभिनेत्री खुशबू तावडेच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलणार आहे. खुशबू दुसऱ्यांदा आई होणार आहे. काही दिवसांपूर्वी खुशबूने ही आनंदाची बातमी जाहीर केली. याआधी २ नोव्हेंबर २०२१मध्ये खुशबूला मुलगा झाला होता. ज्याचं नाव राघव असून तो ३ वर्षांचा आहे. त्यानंतर आता खुशबू व संग्राम साळवीच्या घरी दुसऱ्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. जुलै महिन्यात खुशबूचं डोहाळे जेवण पार पडलं. नुकताच याचा व्हिडीओ समोर आला आहे.