फॉलोअर्स नाहीत म्हणून मिळत नाहीय काम? ज्येष्ठ अभिनेते कंवरजीत पेंटल यांनी व्यक्त केलं दु:ख
ज्येष्ठ अभिनेते कंवरजीत पेंटल यांनी सोशल मीडियावर फॉलोअर्स नसल्याने काम मिळत नसल्याचा अनुभव शेअर केला आहे. ७७ वर्षीय पेंटल यांनी अनेक गाजलेले चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केले आहे, परंतु कमी फॉलोअर्समुळे त्यांना कामासाठी संघर्ष करावा लागत आहे. अभिनेते मनमीत सिंह यांनी हा व्हिडिओ शेअर केला असून, मराठी कलाकारांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.