‘मन धागा-धागा…’ फेम मयुरी देशमुखला गणेशोत्सवातील ‘ही’ गोष्ट अजिबात आवडत नाही, म्हणाली…
‘खुलता कळी खुलेना’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशमुख सध्या 'स्टार प्रवाह'च्या 'मन धागा-धागा जोडते नवा'मध्ये पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी मयुरीची 'मन धागा-धागा जोडते नवा' मालिकेचे जबरदस्त एन्ट्री झाली. तिच्या एन्ट्रीमुळे या मालिकेला नवं वळणं मिळालं. या मालिकेत मुयरीने सुखदा ही व्यक्तिरेखा साकारली आहे. अल्पावधीत मयुरीने साकारलेली सुखदा घराघरात पोहोचली आहे. अशा या लोकप्रिय अभिनेत्रीला गणेशोत्सवातील एक गोष्ट अजिबात आवडत नाही, याविषयी तिने नुकतंच परखड मत मांडलं आहे.