“१० वर्ष नाटक करून…”, सूरज जिंकल्यावर अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, “हा झापूक झुपूक बोलून…”
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा महाविजेता जाहीर करताना ‘कलर्स मराठी’चे हेड्स देखील उपस्थितीत होते. तेव्हा प्रोगोमिंग हेड केदार शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली. सूरजला घेऊन एक चित्रपट करणार असल्याचं केदार शिंदेंनी सांगितलं. या चित्रपटाचं नाव ‘झापुक झुपूक’ असणार आहे. ही सूरजसाठी एक सुवर्णसंधी आहे. याच पार्श्वभूमीवर एका मराठी अभिनेत्याने पोस्ट लिहिली आहे; जी सध्या व्हायरल होतं आहे.