Suraj Chavan Said This Thing About His X Girl Friend
1 / 31

‘एक्स गर्लफ्रेंड परत आली तर स्वीकारणार का?’, सूरज चव्हाण म्हणाला, “बच्चाला आता…”

मनोरंजन October 9, 2024

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनचा विजेता सूरज चव्हाण याचं राज्यभरात कौतुक होतं आहे. अंतिम फेरीत ट्रॉफी जिंकल्यानंतर त्याच्या गुलिगत धोका आणि झापूकझुपूक ट्रेंडचं कौतुक होतं आहे. एक्स गर्लफ्रेंड परत आली तर स्वीकारणार का, या प्रश्नावर सूरजने तिला स्वीकारणार नसल्याचं सांगितलं कारण तिचं लग्न होऊन तिला मूल झालं आहे. सूरजने आपल्या यशाचं श्रेय आई-वडिलांच्या आशीर्वादाला दिलं आहे.

Swipe up for next shorts
Aasiya Kazi Gulshan Nain Wedding date
2 / 31

८ वर्षांचं प्रेम अन् कुटुंबियांचा विरोध; लोकप्रिय मुस्लीम अभिनेत्री करतेय आंतरधर्मीय लग्न

'बंदिनी' मालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री आसिया काझी तिच्या आंतरधर्मीय लग्नामुळे चर्चेत आहे. ती आणि तिचा बॉयफ्रेंड अभिनेता गुलशन नैन २९ नोव्हेंबरला लग्न करणार आहेत. आठ वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. कुटुंबाचा विरोध असूनही त्यांनी एकमेकांची साथ सोडली नाही. त्यांच्या लग्नाला कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र उपस्थित राहणार आहेत.

Swipe up for next shorts
3 / 31

“आजकाल समझोत्याचे राजकारण सुरू, संख्याबळाला…”, मुख्यमंत्री पदावरून नितीन गडकरींचं विधान

राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती उभी ठाकली आहे. मागील वेळी मुख्यमंत्री पदाच्या गणितावरून राजकीय उलथापालथ झाली होती. यंदा कोण मुख्यमंत्री होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपचा मुख्यमंत्री असावा असे मत व्यक्त केले. अमित शाहांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पद देण्याचे संकेत दिले होते, परंतु निवडणुकीनंतर विचारमंथन होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

Swipe up for next shorts
Vikrant Massey family religion variety
4 / 31

वडील ख्रिश्चन, भाऊ मुस्लीम तर आई…; बॉलीवूड अभिनेत्याचा कुटुंबाबत खुलासा

बॉलीवूड अभिनेता विक्रांत मॅसीने आपल्या कुटुंबातील धार्मिक विविधतेबद्दल खुलासा केला आहे. त्याचे वडील ख्रिश्चन, आई शीख, पत्नी हिंदू आणि भाऊ इस्लाम धर्माचे पालन करतात. विक्रांतने सांगितले की, त्याचे कुटुंब सर्व धर्मांचा आदर करते. त्याने करवा चौथला पत्नीच्या पाया पडल्यावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. विक्रांतचा 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट १५ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

maharashtra richest candidate for assembly election 2024
5 / 31

पायाला फ्रॅक्चर, गोल्फ कार्टवर प्रचार; महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवाराची चर्चा!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. २८८ मतदारसंघांमध्ये प्रमुख लढत महायुती व महाविकास आघाडीमध्ये आहे. भाजपा उमेदवार पराग शाह यांना पायाला फ्रॅक्चर असूनही ते प्रचार करत आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी गोल्फकार्टची व्यवस्था केली आहे. पराग शाह हे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राखी जाधव यांचं आव्हान आहे.

Bollywood actress Malaika Arora shares her 9 health goals for November
6 / 31

नो अल्कोहोल, ८ तास झोप अन्…; मलायका अरोराने नोव्हेंबर महिन्यात स्वीकारली ‘ही’ आव्हाने

आपल्या डान्सने आणि कातिल अदांनी घायाळ करणारी बॉलीवूडची अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. मलायका सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. एकाबाजूला तिच्या वडिलांनी केलेली आत्महत्या आणि दुसऱ्याबाजूला अर्जुन कपूरबरोबर झालेला ब्रेकअप. मलायका संबंधित या दोन विषयावर सध्या चर्चा रंगल्या आहेत.

Eknath Shinde bag checking
7 / 31

“बॅगेत फक्त कपडे, युरिन पॉड…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याही सामानांची तपासणी!

राज्यात निवडणूक प्रचार सुरू असून, नेत्यांच्या बॅगांची तपासणी केली जात आहे. उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या बॅगांची तपासणी झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगांचीही तपासणी करण्यात आली. पालघर दौऱ्यावर असताना शिंदे यांनी "माझ्या बॅगेत फक्त कपडे आहेत. युरिन पॉट नाहीय" असे म्हणत उद्धव ठाकरेंवर टीका केली. अजित पवारांनी तपासणीला सहकार्य करत निवडणुका निष्पक्ष होण्यासाठी हे आवश्यक असल्याचे म्हटले.

Maharashtrachi Hasyajatra fame prithvik pratap reaction on prajakta mali phullwanti movie
8 / 31

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘फुलवंती’ चित्रपटाची चर्चा, पृथ्वीक प्रताप म्हणाला…

अमेरिका दौरा झाल्यानंतर आता पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांचा खळखळून हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अवलीय कलाकार सज्ज झाले आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या कार्यक्रमातील कलाकार सेटवरील मजा-मस्तीचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. अशातच प्राजक्ता माळीने देखील सेटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये पृथ्वीक प्रतापसह हास्यजत्रेतील वादक अमीर हडकर ‘फुलवंती’ चित्रपटाचं कौतुक करताना दिसत आहेत.

Marathi Actors Akshay Kelkar First Reaction after announced abeer gulal serial will off air
9 / 31

‘अबीर गुलाल’ मालिका बंद होणार असल्याचं कळताच अक्षय केळकरला बसला धक्का, म्हणाला…

२७ मेपासून सुरू झालेली ‘अबीर गुलाल’ मालिका अवघ्या सहा महिन्यात ऑफ एअर होणार आहे. या मालिकेत अभिनेता अक्षय केळकर, पायल जाधव, गायत्री दातार प्रमुख भूमिकेत आहेत. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. पण, आता अचानक बंद केली जाणार आहे. याबाबत दोन दिवसांपूर्वी कलाकार मंडळींना कळालं. याविषयी अक्षय केळकर काय म्हणाला? जाणून घ्या…

Ajit Pawar on Gautam Adani
10 / 31

अजित पवारांचं २४ तासांत घुमजाव, गौतम अदाणींबरोबर झालेल्या बैठकीबाबत म्हणाले…

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर एनसीपी-भाजप सरकार स्थापनेसाठी झालेल्या बैठकीत गौतम अदाणी हजर होते, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला होता. या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. विरोधकांनी उद्योगपती सरकार ठरवणार का, असा प्रश्न उपस्थित केला. मात्र, अजित पवारांनी नंतर अदाणी नव्हते असे सांगून घुमजाव केले. भाजपाने ही बैठक २०१७ मध्ये झाल्याचे सांगितले. सुप्रिया सुळेंनीही या बैठकीबद्दल अनभिज्ञता व्यक्त केली.

Supreme Court on bulldozer action
11 / 31

‘बुलडोझर कारवाई’बाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल; प्रक्रियेवरच उपस्थित केलं प्रश्नचिन्ह!

सर्वोच्च न्यायालयाने 'बुलडोझर कारवाई' प्रकरणात निकाल दिला आहे. न्यायालयाने गुन्ह्याचा आरोप असलेल्या व्यक्तीच्या घरावर बुलडोझर कारवाई करणं घटनाविरोधी असल्याचं स्पष्ट केलं. न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने प्रशासनाच्या मनमानी कारभारावर वचक बसवण्यासाठी नियमावली जारी केली. राजस्थान आणि मध्य प्रदेशातील अशा कारवायांमुळे तणाव निर्माण झाला होता, ज्यावर न्यायालयाने निर्देश दिले आहेत.

Bigg Boss 18 Shilpa Shirodkar New Time God of the House
12 / 31

मराठी अभिनेत्री झाली ‘टाइम गॉड’, आता ‘बिग बॉस १८’च्या घराची जबाबदारी तिच्या हातात

Bigg Boss 18: 'बिग बॉस'च्या १८व्या पर्वाचा सध्या सहाव्या आठवडा सुरू आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून विवियन डिसेना 'टाइम गॉड' ( Time God ) आहे. 'बिग बॉस'च्या १८व्या पर्वाचा पहिला 'टाइम गॉड' अरफीन खान झाला होता. त्यानंतर विवियनकडे ही जबाबदारी आली. गेले दोन आठवडे विवियन ही जबाबदारी पार पाडत आहे. पण आता सहाव्या आठवड्यात विवियननंतर मराठी अभिनेत्री 'टाइम गॉड' झाल्याचं समोर आलं आहे.

Justice Chandiwal Said This Thing About Devendra Fadnavis
13 / 31

“सचिन वाझे -अनिल देशमुखांनी फडणवीसांना गुंतवण्याचा..”, जस्टिस चांदिवाल काय म्हणाले?

न्यायमूर्ती चांदिवाल यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणीचा आरोप झाल्यानंतर नेमलेल्या समितीचा अहवाल २७ एप्रिल २०२२ रोजी उद्धव ठाकरेंना सादर केला होता. त्यांनी मुलाखतीत सांगितले की, अहवालातील बाबी शासनाला मान्य नसल्याने तो सार्वजनिक केला गेला नसावा. तसेच, चौकशीदरम्यान अडथळे आले आणि आवश्यक मदत मिळाली नाही. सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना गुंतवण्याचा प्रयत्न केला होता.

Bigg Boss 18 Avinash Mishra and Digvijay Rathee will be seen getting into a physical spat during a task
14 / 31

टास्कदरम्यान अविनाश मिश्राच्या संयम सुटला, जोरात धक्का मारून दिग्विजयला किचनमध्ये पाडलं

 सहाव्या आठवड्यात रजत आणि शिल्पा या दोघांपैकी एकजण टाइम गॉड होणार असल्याचं निश्चित झालं आहे. आता विवियन डिसेनानंतर कोण टाइम गॉड होतंय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशातच ‘बिग बॉस १८’चा एक प्रोमो खूप व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये टास्कदरम्यान घरात मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे.

sana malik
15 / 31

“नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!

सना मलिक यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, दाऊद इब्राहिमशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात नवाब मलिक यांच्या अटकेनंतर अनुशक्तीनगर मतदारसंघात त्यांनी काम केलं. या काळात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, विशेषतः पक्षातील लोकांनी त्रास दिला. अजित पवारांनी मात्र त्यांना पूर्ण साथ दिली. २०१७ च्या निवडणुकीत अपयश आल्यानंतर त्या अधिक सक्रिय झाल्या आणि विधानसभेची निवडणूक लढवत आहेत.

Jharkhand Assembly Election 2024 Phase 1 Voting Updates in Marathi
16 / 31

झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, वायनाडसाठीही पोटनिवडणूक!

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. ४३ जागांसाठी मतदान होत असून, उर्वरित ३८ जागांसाठी २० नोव्हेंबरला मतदान होईल. भाजप आणि काँग्रेसमध्ये तीव्र लढत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आदिवासींच्या हक्कांसाठी समिती स्थापन करण्याची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात ६८३ उमेदवार रिंगणात आहेत. याशिवाय, देशातील १० राज्यांतील ३२ जागांवर पोटनिवडणुकीचे मतदानही होत आहे.

actor himansh kohli wedding photos out
17 / 31

बॉलीवूड अभिनेत्याने मंदिरात साधेपणाने केलं लग्न, फोटो आले समोर

बॉलीवूड November 13, 2024

'यारियां' फेम प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता हिमांश कोहलीने लग्न केलं आहे. हिमांशने नवी दिल्लीतील एका मंदिरात साधेपणाने विनीशी लग्न केलं. ३५ वर्षांच्या हिमांशने अरेंज मॅरेज केलं असून, लग्नात फक्त कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. हिमांशच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. हिमांशचं फिल्मी करिअर फारसं यशस्वी राहिलं नाही.

collector bro kerala ias officer n prashantha suspended
18 / 31

‘कलेक्टर ब्रो’ IAS अधिकारी निलंबित; वरीष्ठ अधिकाऱ्यावर आगपाखड केल्यावरून कारवाई!

केरळ सरकारने दोन आयएएस अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारणावरून निलंबनाची कारवाई केली आहे. उद्योग व व्यापार मंडळाचे संचालक के. गोपालकृष्णन यांनी 'मल्लू हिंदू ऑफिसर्स' नावाचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केल्यामुळे आणि कृषीविकास विभागाचे विशेष सचिव एन. प्रशांत यांनी वरिष्ठांवर जाहीररीत्या आक्रमक भूमिका घेतल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. प्रशांत यांच्या कार्यकाळात महत्त्वाच्या फाईल्स गहाळ झाल्याचाही आरोप आहे.

Uddhav Thackeray on CM Post
19 / 31

“माझ्या डोक्यात मुख्यमंत्री पद घुसलंय…”, मविआतील उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका!

राज्यात निवडणुकीची रंगत वाढत असताना मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्याप स्पष्ट नाही. महायुती आणि महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत वक्तव्य केले आहे. त्यांनी सांगितले की, जयंत पाटील किंवा जितेंद्र आव्हाड यांना मुख्यमंत्री केलं तरी हरकत नाही. तसेच, मुख्यमंत्री पदाबाबत आम्ही चर्चा करू, पण महाराष्ट्राचे लुटारू मुख्यमंत्री नकोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

How many times you should wash your bedsheets cleaning tips to wash your sheets
20 / 31

तुम्ही तुमची बेडशीट महिन्यातून किती वेळा धुता?

धकाधकीच्या दिवसानंतर घरी परतताच लगेच पलंगावर आपलं थकलेलं शरीर टाकावं आणि सुखद अनुभव घ्यावा हे नेहमीच सगळ्यांना वाटत असतं. पण, जेव्हा बेडशीट नुकतीच फ्रेश घातलेली असते तेव्हा त्याच्या सुगंधामुळे तुम्हाला गाढ झोप लागते. परंतु व्यस्त जीवनशैलीमुळे आणि खूप काम असल्याने तुमची बेडशीट बदलायची राहूनच जाते. पण, तुम्हाला हा एक प्रश्न नक्कीच मनात येत असेल की, लोकांनी त्यांच्या बेडशीट किती वेळा धुवाव्यात?

celebrated Diwali in America for the first time watch video
21 / 31

भाऊ कदम यांच्या लेकीने पहिल्यांदाच अमेरिकेत ‘अशी’ साजरी केली दिवाळी, पाहा व्हिडीओ

आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे सर्वांचे लाडके अभिनेते म्हणजे भाऊ कदम. गेल्या कित्येक वर्षांपासून भाऊ कदम प्रेक्षकांना त्यांचं टेन्शन विसरायला लावून मनसोक्त हसवण्याचं काम करत आहेत. अशा या लोकप्रिय विनोदवीरांची लेक सध्या परदेशात शिक्षण घेत आहे. काही महिन्यापूर्वी भाऊ कदम यांची लेक मृण्मयी कदम अमेरिकेत शिक्षणासाठी गेली. तेव्हापासून ती अमेरिकेतील व्लॉग सोशल मीडियावर शेअर करत असते.

Uddhav Thackeray on Pranpratishtha
22 / 31

“राम मंदिर गळनेका थांबेगा तो…”, उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यामुळे एकच हशा!

उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर टीका केली आहे. त्यांनी नरेंद्र मोदींवर मिश्किल टिप्पणी करत, "मंदिर गळतंय, ते थांबल्यावर मी जाईन," असं म्हटलं. ठाकरे उमरगा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण स्वामी यांच्या प्रचारार्थ बोलत होते. त्यांनी शंकराचार्यांच्या अनुपस्थितीवरही टीका केली आणि भ्रष्टाचाराचा आरोप केला. ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री होण्यापूर्वी आणि नंतरही त्यांनी राम मंदिराला भेट दिली होती.

actor amit tandon cheated wife ruby tandon
23 / 31

अनेक अफेअर, ठरवून पत्नीची फसवणूक अन्..; अभिनेत्याचे स्वतःबद्दल धक्कादायक खुलासे

लोकप्रिय टीव्ही अभिनेता व गायक अमित टंडन याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. 'इंडियन आयडल १'मधून करिअरची सुरुवात करणाऱ्या अमितने अनेक मालिकांमध्ये काम केलंय. त्याने पत्नीची अनेकवेळा फसवणूक केल्याची कबुली दिली. २०१७ मध्ये घटस्फोट घेतल्यानंतर २०२३ मध्ये पुन्हा तिच्याशीच लग्न केलं. अमित व रुबी यांना एक मुलगी आहे.

Ajit pawar on NCP BJP Alliance
24 / 31

“राष्ट्रवादी-भाजपाच्या युतीच्या बैठकीत गौतम अदाणीही होते”, अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांनी भाजपाबरोबर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती, परंतु हे सरकार अल्पावधीत कोसळलं. अजित पवारांनी खुलासा केला की, शरद पवारांच्या सांगण्यावरूनच हा शपथविधी झाला होता. या युतीसाठी दिल्लीत गौतम अदाणी यांच्या घरात बैठक झाली होती. अजित पवारांनी सांगितलं की, शरद पवारांच्या मनात काय आहे, हे कोणालाच ओळखता येणार नाही.

Mithun Chakraborty gets threat from pakistani gangster Shahzad Bhatti
25 / 31

पाकिस्तानी गँगस्टरकडून मिथुन चक्रवर्ती यांना धमकी

बॉलीवूड November 12, 2024

अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खाननंतर ज्येष्ठ अभिनेते व भाजपा नेते मिथुन चक्रवर्ती यांनाही लॉरेन्स बिश्नोईशी संबंधित पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीकडून धमकी आली आहे. मिथुन यांनी मुस्लिमांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर माफी मागावी, अशी मागणी भट्टीने केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये भट्टीने मिथुन यांना १०-१५ दिवसांत माफी मागण्याचा सल्ला दिला आहे.

Bigg boss 18 karan veer Mehra chum darang shrutika arjun rajat dalal seven contestants nominated
26 / 31

Bigg Boss 18: सहाव्या आठवड्यातील नॉमिनेशन प्रक्रिया ‘अशी’ पार पडली, सात सदस्य झाले नॉमिनेट

Bigg Boss 18: छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बिग बॉस’चं यंदा १८वं पर्व सुरू आहे. ६ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा आता सहावा आठवडा आहे. नुकतीच सहाव्या आठवड्यातील नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली. नेहमी प्रमाणे याही नॉमिनेशन प्रक्रियेत वाद पाहायला मिळाले. एकूण सात सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत.

jagadguru rambhadracharya ji on kharge sadhu
27 / 31

Video: “भारतात भगवाधारींनीच राजकारण करावं, सूट-बूट घालणाऱ्यांनी…”, रामभद्राचार्यांचं विधान

देश-विदेश November 12, 2024

गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विधानाची चर्चा आहे. मुंबईतील 'संविधान बचाव संमेलन' कार्यक्रमात खर्गेंनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य करत भगवे कपडे परिधान करण्यावर टीका केली. यावर जगदगुरू रामभद्राचार्यांनी प्रत्युत्तर देत भगवाधारींनी राजकारणात यावे, असे मत व्यक्त केले. त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या 'कटेंगे तो बटेंगे' घोषणेचं समर्थनही केलं.

Amit Thackeray on Sada
28 / 31

प्रचारादरम्यान सदा सरवणकरांना महिलांनी जाब विचारला; अमित ठाकरे म्हणाले, “मी तिकडे…”

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहीम कोळीवाड्यात शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) उमेदवार सदा सरवणकर यांना महिलांनी प्रश्न विचारत धारेवर धरले. महिलांनी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स हटवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. या घटनेवर अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत स्टॉल्स महिलांच्या रोजगारासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले. समाधान सरवणकरांनी महिलांवर दारू विक्रीचा आरोप केला, तर अमित ठाकरे यांनी हे आरोप फेटाळले.

Kushal Badrike and Viju Mane wished Pravin Tarde on his birthday in a funny prediction
29 / 31

Video: प्रवीण तरडेंसाठी कुशल बद्रिकेने लिहिलेल्या कविता ऐकून विजू माने वैतागले, म्हणाले…

दमदार अभिनयाबरोबरच आपल्या लेखणीने अन् दिग्दर्शकाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे अभिनेते म्हणजे प्रवीण तरडे. ‘देऊळ बंद’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘धर्मवीर’, असे दर्जेदार चित्रपट त्यांनी मराठी सिनेसृष्टीला दिले आहेत. तसंच मराठीसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीत प्रवीण तरडेंनी आपली छाप उमटवली आहे. अशा या हरहुन्नरी कलावंताचा सोमवारी ( ११ नोव्हेंबर ) ५०वा वाढदिवस होता. यानिमित्ताने अभिनेता कुशल बद्रिकेने खास ५० कविता लिहिल्या आहेत. याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Aishwarya Rai reaction when was introduced as Aishwarya Rai Bachchan
30 / 31

‘ऐश्वर्या राय बच्चन’ अशी ओळख करून दिल्यावर अभिनेत्री म्हणालेली, “मी अभिषेक बच्चनशी…”

बॉलीवूड November 12, 2024

मागील काही महिन्यांपासून ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू आहे. दोघे वेगळे राहतात अशी अफवा आहे, परंतु बच्चन कुटुंबाने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. ऐश्वर्याच्या जुन्या मुलाखतीत तिने 'ऐश्वर्या राय बच्चन' या नावावर आश्चर्य व्यक्त केले होते. ऐश्वर्या व अभिषेकची भेट २००२ मध्ये झाली आणि २००७ मध्ये त्यांनी लग्न केले. त्यांना २०११ मध्ये मुलगी झाली, जी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावते.

dsp meets vegetable vendor friend in bhopal
31 / 31

१४ वर्षांनी DSP नी भाजीवाल्या मित्राला शोधून काढलं, गाडीतून उतरले..गळाभेट घेतली; भावनिक..

देश-विदेश November 12, 2024

मध्य प्रदेशातील डीएसपी संतोष पटेल यांनी १४ वर्षांपूर्वीच्या भाजीवाल्या मित्र सलमान खानला शोधून त्याची गळाभेट घेतली. भोपाळमध्ये शिक्षण घेत असताना सलमानने पटेलला मोफत भाजी देऊन मदत केली होती. या भावनिक भेटीचा व्हिडीओ पटेल यांनी सोशल मीडियावर शेअर केला. सलमाननेही या आठवणींना उजाळा देत पटेलच्या यशाचा अभिमान व्यक्त केला.