वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी मराठी अभिनेत्रीची प्रतिक्रिया, म्हणाली, “सुनेला मारहाण करून…”
पुण्यातील मुळशी तालुक्यात वैष्णवी हगवणेने हुंड्याच्या छळामुळे आत्महत्या केली. या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली असून, अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. याबद्दल अभिनेत्री अश्विनी महांगडेनेही इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत "ही क्रूर बाब आहे आणि आरोपींना योग्य ती शिक्षा व्हायला हवी" असं म्हटलं आहे. या घटनेचा तिने निषेधही केला आहे. याप्रकरणी वैष्णवीच्या पतीसह तिघांना अटक करण्यात आली आहे, तर सासरे आणि दीर फरार आहेत.