“तुझे कपडे काढून अंतर्वस्त्रामध्ये…”, साजिद खानवर आरोप करणारी नवीना बोले आहे तरी कोण?
सध्या हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री नवीना बोले खूप चर्चेत आली आहे. या चर्चेचं कारण आहे, तिने लोकप्रिय दिग्दर्शक साजिद खानवर केलेले गंभीर आरोप. नवीनाने साजिदवर कास्टिंग काऊचचा आरोप केला आहे. “माझ्या आयुष्यातला सर्वात भयंकर अनुभव मी साजिद खानकडून घेतला आहे. घरी बोलावून साजिदने मला कपडे काढून अंतर्वस्त्रांमध्ये येऊन बसायला सांगितलं होतं,” असा आरोप नवीनाने केला आहे. ही नवीना बोले नेमकी कोण आहे? जाणून घेऊया.