७० वर्षीय अभिनेत्यासह रोमँटिक सीन करण्याबद्दल काय म्हणाली अभिनेत्री त्रिशा कृष्णन?
दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन लवकरच 'ठग लाइफ' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ती कमल हासन यांच्यासह काम करत आहे. ट्रेलरमधील त्यांच्या रोमँटिक सीनमुळे चर्चेत आलेल्यानंतर त्रिशाने प्रतिक्रिया दिली आहे. चित्रपट ५ जूनला प्रदर्शित होणार असून, त्रिशा प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. यापूर्वी ती 'विदामुयार्ची' आणि 'गुड बॅड अगली'मध्ये झळकली होती.