निबंधच लिहावा लागेल…; प्रिया बापटबरोबर कशावरून भांडण होतं? उमेश कामतचं मजेशीर उत्तर
उमेश कामत आणि प्रिया बापट हे मराठी फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल आहे. २०११ मध्ये दसऱ्याच्या दिवशी त्यांचे लग्न झाले. दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असून, त्यांच्या नात्याबद्दल विविध मुलाखतींमधून व्यक्त होतात. एका चाहत्याने प्रियाबरोबरच्या भांडणाबद्दल विचारल्यावर उमेशने मजेशीर उत्तर दिले की, त्यांना अनेक विषयांवर भांडण होते, पण शेवटी ते हसत-आनंदाने आयुष्य जगतात.