मानसी पारेखला ‘कच्छ एक्सप्रेस’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्टीय पुरस्कार
७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री मानसी पारेखला गुजराती चित्रपट 'कच्छ एक्सप्रेस' साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मानसीने टीव्ही मालिकांमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' सारख्या चित्रपटांमध्ये यश मिळवले. ती एक प्रशिक्षित शास्त्रीय गायिका असून, तिच्या अभिनय आणि गायनाच्या कौशल्यांमुळे ओळखली जाते. मानसीने गुजराती चित्रपटांना मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्व अधोरेखित केले.