कुठं आहे तो नागराज मंजुळे? रिंकू राजगुरूनं सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा; म्हणाली…
रिंकू राजगुरूने 'सैराट'च्या कास्टिंगचा मजेशीर किस्सा शेअर केला आहे. ती १३ वर्षांची असताना राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना भेटायला गेली होती. तिने त्यांना "कुठं आहे तो नागराज मंजुळे?" असा प्रश्न विचारला. मंजुळे यांनी तिला ऑडिशनसाठी विचारले आणि तिने सहजपणे नाचून दाखवले. 'सैराट'नंतर रिंकूने 'कागर', 'झुंड', 'मेकअप', 'झिम्मा २' आणि 'आशा' यांसारख्या सिनेमांत काम केले आहे.