अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्या ‘आदि अनंत’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर समोर!
अभिनेते अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे 'आदि अनंत' या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. संकर्षणने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत या चित्रपटाची माहिती दिली आहे. महेश लिमये दिग्दर्शित आणि संकर्षण लिखित हा चित्रपट १२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात वडील-मुलाच्या भावनिक नात्यावर आधारित कथा आहे. "विनामुल्य मिळालेली नाती फार मोलाची असतात" अशी टॅगलाइन आहे.