“आम्ही थेट सोन्याची जेजुरी…”, संकर्षण कऱ्हाडे पोहोचला खंडेरायाच्या दर्शनाला, कारण आहे खास
संकर्षण कऱ्हाडेने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करीत ‘आदि अनंत’ सिनेमाचे पोस्टर जेजुरीवर रिलीज केल्याचे शेअर केले. यावेळी संकर्षणसह महेश लिमये आणि‘आदि अनंत’च्या टीमने पायी जेजुरी गड चढून मल्हारी मार्तंडाचे दर्शन घेतले. पहिल्या पायरीवर डोके टेकवून, त्यांनी गडाच्या पायऱ्या सर केल्या. यावेळी संकर्षणला अनेक चाहते भेटल्याचे दिसून आले. ‘आदि अनंत’च्या टीमने भंडारा उधळीत नव्या सिनेमाच्या यशासाठी आशीर्वाद घेतले.