किती शिकलाय अंकिता वालावलकरचा संगीत दिग्दर्शक पती? कुणाल भगत खुलासा करत म्हणाला…
'बिग बॉस मराठी' फेम अंकिता वालावलकरने संगीत दिग्दर्शक कुणाल भगतसोबत नुकतेच लग्न केले. कुणाल सोशल मीडियावर सक्रिय असून, त्याने इन्स्टाग्रामवर प्रश्नोत्तर सेशन घेतले होते. त्यात त्याच्या शिक्षणाबद्दल विचारले असता, त्याने पेट्रोकेमिकलमध्ये बीई केल्याचे सांगितले. कुणालने अनेक मराठी चित्रपट व मालिकांसाठी संगीत दिले आहे. लग्नानंतर त्यांनी पहिली होळी पारंपरिक पद्धतीने साजरी केली.