“एका ताटात जेवायचो, त्याचं आणि माझं नातं…”, नागराज मंजुळेंबद्दल छाया कदम म्हणाल्या…
नागराज मंजुळे हे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्यांच्या 'सैराट' चित्रपटाने महाराष्ट्राबाहेरही लोकप्रियता मिळवली. अभिनेत्री छाया कदम यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नागराज मंजुळेंबरोबरच्या मैत्रीबद्दल आणि सेटवरील अनुभवांबद्दल सांगितलं. त्यांनी नागराज यांच्याबरोबरच्या मैत्रिचे किस्से सांगितले. छाया कदम यांनी हिंदीतही काम केलं असून 'बिग बॉस'ची ऑफर नाकारल्याचं सांगितले.