शालू-जब्याचं खऱ्या आयुष्यात ठरलं? राजेश्वरी खरात रोमँटिक फोटो शेअर करत म्हणाली…
नागराज मंजुळे दिग्दर्शित 'फँड्री' चित्रपटातील शालू आणि जब्या या भूमिकांमुळे चर्चेत असलेले राजेश्वरी खरात आणि सोमनाथ अवघडे सोशल मीडियावर सक्रिय आहेत. राजेश्वरीने नुकतेच सोमनाथबरोबरचे रोमँटिक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंना 'अजूनही मला वाटतं स्वप्न आहे सगळं…' असे कॅप्शन दिले आहे. चाहत्यांनी या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.