‘गोंधळ’ ऑस्करला गेल्यावर दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया; केली ‘ही’ मोठी घोषणा
२०१५ मधील 'कोर्ट' नंतर ११ वर्षांनी मराठी चित्रपटसृष्टीने जागतिक मंचावर इतिहास रचला आहे. संतोष डावखर दिग्दर्शित 'गोंधळ' हा चित्रपट ९९व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत एंट्री ठरला आहे. डावखर यांनी या सन्मानाबद्दल आभार मानले आणि चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रशंसा केली. 'गोंधळ' पाच भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून, जागतिक प्रदर्शनाचे नियोजनही सुरू आहे.