भारताने ऑस्करसाठी पाठवला मराठी चित्रपट ‘गोंधळ’!
९९ व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताकडून 'गोंधळ' या मराठी चित्रपटाची अधिकृत एंट्री म्हणून निवड झाली आहे. संतोष डावखर दिग्दर्शित हा चित्रपट महाराष्ट्राच्या पारंपरिक 'गोंधळ' या लोककलेवर आधारित आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने मुंबईत ही घोषणा केली. चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख यांसारखे कलाकार आहेत. गोव्यातील 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया' मध्ये या चित्रपटाला 'सिल्व्हर पीकॉक' पुरस्कार मिळाला होता.