“आरशात चेहरा पाहिलास का?” मराठमोळ्या सोनाली कुलकर्णीला आलेला वाईट अनुभव
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या सुरुवातीच्या काळातील एक वेदनादायी आठवण सांगितली आहे. पुण्यात एका ऑडिशनदरम्यान एका महिलेने तिच्या सावळ्या रंगावरून अपमान केला होता. या घटनेमुळे ती खूप खचली होती. मात्र, गिरीश कर्नाड यांच्या भेटीनंतर तिला धीर आला. सोनालीने नैसर्गिक सौंदर्य आणि वयानुसार येणाऱ्या बदलांना स्वीकारण्याचे महत्त्वही सांगितले. ती म्हणाली, "मी सुंदर आहे कारण माझा दृष्टिकोन सुंदर आहे."