‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ने बॉक्स ऑफिसवर रचला ‘हा’ विक्रम, एकाच दिवशी कमावले..
गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेला हेमंत ढोमे दिग्दर्शित 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' सिनेमा प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळवत आहे. मराठी शाळा आणि भाषेवर आधारित या सिनेमाने पहिल्या आठवड्यात ६.१४ कोटींची कमाई केली आहे. सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर यांसारख्या कलाकारांनी भूमिका साकारलेल्या या सिनेमात शाळा वाचवण्याचे प्रयत्न दाखवले आहेत.