“मधूताई…”, ज्येष्ठ लावणी कलावंत मधू कांबीकर यांच्या निधनाने मेघा घाडगे भावुक; म्हणाली…
मधू कांबीकर यांच्या निधनानंतर मेघा घाडगेने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करीत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मेघाने लिहिले, मधूताई… 'सखी माझी लावणी' हरपली..!! लावणीचा ठसका, घुंगरांचा नाद आणि पडद्यावरचा जिवंत अभिनय यांनी मधूताईंनी रसिकांच्या मनावर अनेक वर्षे राज्य केले. 'एक होता विदूषक'मधील त्यांची भूमिका आणि त्यांनी सादर केलेली लावणी आम्ही कधीही विसरू शकणार नाही."