‘दशावतार’ सिनेमात दशावतार दाखवलाच नाही…; दिगंबर नाईक यांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाले…
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या प्रमुख भूमिकेत असलेला ‘दशावतार’ चित्रपट १२ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झाला आणि सुपरहिट ठरला. दिगंबर नाईक यांनी ‘दशावतार’बद्दल मत व्यक्त करताना सांगितले की, कोकणातील असूनही त्यांना ‘हापूस’मध्ये घेतले गेले नाही. तसेच, ‘दशावतार’ चित्रपटात कोकणातील दशावतार योग्य प्रकारे दाखवला गेला नाही, असेही त्यांनी नमूद केले.