अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, निर्माता या चारही भूमिका उत्तमरित्या पेलणारा कलाकार म्हणजे हेमंत ढोमे. हेमंत नेहमी वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट घेऊन येत असतो. ‘पोस्टर गर्ल’, ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’ यांसारखे दर्जेदार चित्रपट हेमंतने मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. नवीन वर्षात हेमंत नवा चित्रपट घेऊन येत आहे. ‘फसक्लास दाभाडे’ असं चित्रपटाचं नाव आहे. अशातच हेमंत ढोमेच्या कुटुंबात नवीन सदस्य आली आहे; जिच्या फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.