योगासन, प्राणायम अन्…; सुनील तावडेंनी दिला फिटनेसचा मंत्र, रोज न चुकता करतात ‘ही’ एक गोष्ट
सुनील तावडे फिटनेस टिप्स : लोकप्रिय अभिनेते सुनील तावडे यांनी फिटनेस रूटीन शेअर केले. त्यांनी दारू, सिगारेट, तंबाखू आणि मांसाहार टाळल्याचे सांगितले. ते सकाळी चार वाजता उठून योगासने, प्राणायम आणि आवाजाचे व्यायाम करतात. आठवड्यातून ३-४ दिवस व्यायाम करतात आणि रोज सहा तास झोप घेतात. संध्याकाळी ६.३० वाजता जेवण करतात आणि त्यानंतर काही खात नाहीत.