“सकाळची गडबड, प्रचंड गर्दी अन् त्यातच मला ताप…”, अमृता खानविनलकरने सांगितला ‘तो’ अनुभव
मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरला प्रवासादरम्यान माणुसकीचा अनोखा अनुभव आला. तिला ताप असताना विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी तिला मदत केली. अमृताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या सहकाऱ्यांचे आभार मानले. तिने सांगितले की, कर्मचाऱ्यांनी तिला तपासणी आणि वैद्यकीय मदतीसाठी तत्परतेने मदत केली. अमृताने हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये काम केले असून, ती आता 'लग्न पंचमी' या मराठी नाटकातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.