१० किलो वजन वाढवलं, नंतर…; प्रिया बापट-उमेश कामतच्या ट्रान्सफॉर्मेशनचं सीक्रेट समोर
मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट तिच्या फिटनेस प्रवासाबद्दल सांगते की, फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन हा दीर्घकाळ चालणारा प्रवास असतो, पण त्याचे चांगले परिणाम नक्कीच दिसतात. नव्या वर्षात प्रिया आणि तिचा नवरा उमेश कामत यांनी जिममधले फोटो शेअर केले होते, ज्यामुळे अनेकजण थक्क झाले. प्रिया तिच्या फिटनेसचे श्रेय उमेशला देते आणि सांगते की, अॅब्स दिसायला लागल्यावर फिटनेससाठी अजून जास्त प्रेरणा मिळते.