“तू आता मोठी…”, वयामुळे हिंदीतलं काम गेलं; सोनाली कुलकर्णीने सांगितला अनुभव, म्हणाली…
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने वयामुळे हिंदीतलं काम गमावल्याचा कटू अनुभव शेअर केला. एका ओटीटी शोसाठी साईन केल्यानंतर, तिघीच्या टीझरमुळे तिला वयाने मोठी दिसल्याचं कारण देऊन काम नाकारलं. सोनालीने कृत्रिम सौंदर्य पद्धतींना नकार देत, स्वतःचं वय स्वीकारण्याचा निर्णय घेतला. तिने सांगितलं की, सौंदर्याच्या पलीकडे जाऊन काम करण्याची गरज आहे आणि लोकांचा दृष्टीकोन बदलावा लागेल.