ठरलं! १५ वर्षांनी येणार मराठी चित्रपट ‘हुप्पा हुय्या’चा सिक्वेल, दिग्दर्शकाने केली घोषणा
२०१० मध्ये आलेल्या 'हुप्पा हुय्या’ चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक समित कक्कड यांनी 'हुप्पा हुय्या २' ची अधिकृत घोषणा सोशल मीडियावर केली आहे. पहिल्या भागातील दमदार कथा आणि व्हीएफएक्सने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. 'हुप्पा हुय्या २' पूर्वीपेक्षा भव्यदिव्य व स्टायलिश ट्रीटमेंटने सज्ज होणार आहे. चित्रपटाच्या लेखनाचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच कलाकारांची नावे जाहीर होणार आहेत.