Video : मतदानानंतरची शाई १० सेकंदांत पुसली…; दिग्दर्शक अभिजीत पानसेंनी पुरावाच दाखवला
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदानादरम्यान बोटावर लावली जाणारी शाई सहजपणे पुसली जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मनसे नेते अभिजीत पानसे यांनी याचा व्हिडीओ शेअर करून शाई सहज पुसली जात असल्याचे दाखवले. त्यांनी नेलपेंट रिमुव्हरने शाई काढून दाखवली. राज्य निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण देत गैरकृत्य रोखण्यासाठी योग्य ती कार्यवाही केली जाईल असे सांगितले.