“२५ वर्ष सतत काम केलं पण…”; स्वत:च्या आरोग्याबाबत मृणाल कुलकर्णींचा खुलासा, म्हणाल्या…
लोकप्रिय अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, ज्यांनी 'सोनपरी'सारख्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घातली. गेली ४०-४५ वर्षे मराठी आणि हिंदी मनोरंजन सृष्टीत कार्यरत आहेत. अभिनयाबरोबरच त्यांच्या सौंदर्याचेही चाहते आहेत. मात्र, करिअरच्या सुरुवातीला त्यांनी तब्येतीकडे दुर्लक्ष केलं होतं, असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं. वयाच्या चाळीशीपर्यंत कामामुळे त्यांनी तब्येतीकडे दुर्लक्ष केल्याचं त्यांनी मान्य केलं.