“सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणारे…”, ‘नवरा माझा नवसाचा’ फेम अभिनेता स्पष्टच बोलला; म्हणाला…
सध्या सोशल मीडियावर कलाकारांना ट्रोल केलं जातं. सचिन पिळगांवकर यांनाही याचा सामना करावा लागला आहे. त्यांच्या सहकलाकार विकास समुद्रे यांनी ट्रोलिंगबद्दल वाईट वाटतं असं म्हटलं आहे. सचिनजींचं काम आणि योगदान मोठं आहे, त्यामुळे त्यांना ट्रोल करणं चुकीचं आहे. विशेषतः GenZ पिढी त्यांना ओळखत नसल्यामुळे ट्रोल करतेय, असं विकास समुद्रे म्हणाले.