फॉलोअर्स बघून काम देण्याबद्दल मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली, “राग येतो आणि…”
मनोरंजन क्षेत्रात सोशल मीडियावरील फॉलोअर्स बघून कलाकारांची निवड करण्याची नवीन पद्धत उदयास आली आहे. यावर मराठी अभिनेत्री प्राजक्ता हनमघरने तिची स्पष्ट भूमिका व्यक्त केली आहे. तिने सांगितले की, सोशल मीडियावरील फॉलोअर्स बघून कास्टिंग करणे गंभीर आहे आणि माध्यमांची सरमिसळ धोकादायक आहे. मला त्याचा त्रास होतो किंवा आनंद होतो; यापेक्षा मला हे खूप गंभीर वाटतं. एक मिलियन आणि बिलियन फॉलोअर्सच्या निम्म्या लोकांनी तरी चित्रपट बघितला पाहिजे किंवा तुमचं काम बघितलं पाहिजे ना? मला याचा राग येतो.