“बाप आहे तोवर त्यांच्याशी बोललं पाहिजे”, प्रवीण तरडेंनी शेअर केला वडिलांबरोबरचा व्हिडीओ
प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर वडिलांबरोबरचा व्हिडीओ शेअर करत आई-वडिलांबरोबर वेळ घालवण्याचं महत्त्व सांगितलं आहे. त्यांनी वडिलांबरोबर क्रिकेट मॅच पाहण्याचा अनुभव शेअर केला आणि वडिलांच्या क्रिकेटप्रेमाबद्दल बोलले. त्यांनी १९८३च्या वर्ल्ड कपसाठी पहिल्यांदा टीव्ही घेतल्याचं सांगितलं. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी वडिलांशी संवाद साधण्याचं महत्त्व अधोरेखित केलं आहे.