प्रवीण तरडेंच्या सिनेमात नेहमी त्यांच्याच मित्रांना संधी का? स्वतः केला खुलासा
मित्रांना सिनेमामध्ये घेण्याबाबत प्रवीण तरडे म्हणाले, "माझ्या नाटकामध्ये माझ्या मित्रांनी बॅक स्टेजलाही कामं केली आहेत. त्यांनी सामान उचलण्याचं आणि लाइट लावण्याचं काम केलंय. तेव्हापासून ते माझ्याबरोबर आहेत. एकत्र इथंपर्यंत आलोय आणि त्यामुळे आता सिनेमासुद्धा एकत्रच करणार. मित्रांना घेण्याचा एक फायदाही असतो. मोठ्या स्टारला सिनेमामध्ये घेतलं, तर प्रमोशनच्या वेळी त्यांच्या तारखा मिळत नाहीत. त्या हीरोचे नखरे ऐकून घ्यावे लागतात; पण मित्रांना सिनेमात घेतलं, तर असं होत नाही.